भोंदूबाबा अशोक खरात व पत्नीविरुद्ध शेतजमीन फसवणुकीची तक्रार; सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे धाव
सोलापूर | प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण परिसरातील एका शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर सहकाऱ्यांविरोधात सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे








